Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पतसंस्थांच्या वसुली अधिकार्यांचे आदर्शमध्ये प्रशिक्षण शिबिर

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडेरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-रायगड आणि आदर्श नागरी सहकारी पतसंस्था-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे बुधवारी (दि. 27 ) जिल्ह्यातील पतसंस्थांमधील वसुली अधिकार्‍यांचे  प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अलिबागमधील  आदर्श भवनामघ्ये बुधवारी घेण्यात आलेल्या या  प्रशिक्षण शिबिरात रायगड जिल्ह्यातील 65पतसंस्थांचे 94 प्रतिनिधी सहभागी झाले होते. रायगडचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अलिबागच्या आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष व राज्य पतसंस्था फेडेरेशनचे संचालक सुरेश पाटील उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांना नियमित वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण देण्याचा मानस जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य फेडेरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, वसुली व्याख्याते डॉ. मच्छिन्द्र मुरुडकर, बँकिंग तज्ज्ञ नितीन वाणी आणि  मुरूडचे सहाय्यक निबंधक श्रीकांत पाटील या वेळी पतसंस्थांच्या वसुली अधिकारी वर्गास 101 व 156 कलमांची अंमलबजावणी करून वसुली कशा प्रकारे करावी, याबाबत मार्गदर्शन केले. आदर्श पतसंस्थेचे सीओ उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आदर्श पतसंस्थेचे संचालक अभिजित पाटील यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply