Breaking News

खारघर, पनवेलमधील प्रचारास वाढता प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर आणि पनवेलमध्ये शनिवारी प्रचाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी

धनुष्यबाणासमोरील बटन दाबून श्रीरंग बारणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

या वेळी पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष राजू सोनी, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केकाने यांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply