Breaking News

जागतिक शोतोकॉन स्पर्धेसाठी पनवेलच्या उर्वी जोशीची निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये राहाणारी उर्वी विनायक जोशी हिची 1 ते 7 ऑगस्टदरम्यान जपानच्या टोकियो शहरात होणार्‍या 15व्या जागतिक शोतोकान स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल बावन बंगलो चेअरमन राहुल नाईक यांनी उर्वीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टोकियोत होणार्‍या जागतिक शोतोकान स्पर्धेत उर्वी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी 2019मध्ये जपानमध्ये झालेल्या जागतिक शोतोकान या मार्शल क्रीडा प्रकारात तिने कांस्यपदक पटकाविले होते. तिची चमकदार कामगिरी सुरूच आहे. या वेळी उर्वीचे मार्गदर्शन अतुल बोरा व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply