Breaking News

रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीचा स्थापना समारंभ

पनवेल ः वार्ताहर

खांदा कॉलनी येथील रोटरी कम्युनिटी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटी या नवीन रोटरी क्लबचा सनद सादरीकरण, स्थापना समारंभ आणि सर्व नवीन सभासदांचा शपथग्रहण विधी साजरा झाला. रोटेरियन ध्वनी हर्मेश तन्ना यांची सनदी अध्यक्षपदी आणि रोटेरियन कमांडर दीपक जांबेकर यांची सनदी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे गव्हर्नर डॉ. अनिल परमार, तसेच आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी डॉ. हेमा परमार, डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डिटेक्टर पंकज पटेल, न्यू क्लबचे सल्लागार आणि सहायक गव्हर्नर मनोज मुनोत, डॉ. राजेश कापसे, रोटरी क्लब ऑफ पनवेल एलाईटच्या अध्यक्षा डॉ. स्वाती लिखिते, सचिव आदित्य जोशी, हरमेश तन्ना यांच्यासह सदस्या मोठर्‍या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे डीजी डॉ. अनिल परमार यांनी नूतन अध्यक्ष ध्वनी यांना सनद, गोंग आणि गेवेल आणि कॉलर प्रदान केले. सनदी कोषाध्यक्ष भावेश रंगपरिया यांना डीजीनी कॉलर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पिन प्रदान केली. अध्यक्ष ध्वनी यांनी त्यांच्या संचालक मंडळाची घोषणा अतिशय अभिनव पद्धतीने केली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व नवीन क्लब सदस्यांनाही रोटरी पिन प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पनवेल सिटीने व्हिडिओद्वारे आपला क्लब लोगो प्रदर्शित केला.

याचबरोबर क्लबच्या ध्वजाचे प्रकाशन करण्यात आले. चार्टर क्लब बुलेटिन मैत्रीचेदेखील प्रकाशन करण्यात आले. एजी मनोज मुनोत आणि जिल्हा सदस्यत्व संचालक रो. पंकज पटेल यांनी नवीन क्लब स्थापनेबद्दल सांगितले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात, रोटरीच्या कामाचा गौरव करीत नवीन क्लबच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. परमार यांनी, इतिहासात प्रथमच आरआयच्या अध्यक्षा एक महिला आहेत आणि नवीन क्लबच्या सनदी अध्यक्ष ध्वनी यादेखील एक महिला आहेत हा खूप छान संयोग आहे, तसेच सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply