Breaking News

मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त

राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. यामध्ये प्रामुख्याने मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांचा समावेश आहे. पनवेल, उरण मधील मनसेच्या एकूण 100 पदाधिकार्‍यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.

नवी मुंबईमध्ये मागील आठ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर असणार्‍या अतुल भगत यांनी त्यांच्या सहकार्‍यांसहीत एकनाथ शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. भगत यांच्यासोबतच मनसेच्या आजी-माजी 65 हून अधिक पदाधिकार्‍यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. भगत यांच्यासोबत नवी मुंबईचे उप-तालुकाध्यक्ष आणि इतर पदाधिकारीही शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदेंनी भगत यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचे आपल्या गटात स्वागत केले. तर या सर्व पदाधिकार्‍यांनी गणपतीची मूर्ती मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिली.

राज्यात सत्तांतर घडवून आणणार्‍या बंडाळीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्के बसू लागले आहेत. ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 67 पैकी 66, तर नवी मुंबई पालिकेतील 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी महिन्याभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन येथील निवासस्थानी भेट घेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केलेला. याआधी पनवेलमधील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply