Breaking News

हद्दपार असलेल्या गुन्हेगार चोरीच्या दुचाकींसह जेरबंद

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबई, रायगड व ठाणे शहरे व जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने गस्त घालत असताना खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातून चोरीच्या दुचाकींसह जेरबंद केले आहे.

गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस हवालदार तुकाराम सुर्यवंशी, पोलीस शिपाई भोपी हे पनवेल हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त घालत असताना खांदेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलवरून फिरताना आढळून आल्याने त्याला घेराव घालून जागीच पकडले. त्याची विचारपूस केली असता तो सध्या हद्दपार असलेला गुन्हेगार मसूद उर्फ मक्सुद अहमद सय्यद (वय 26, रा. कळंबोली) असे निष्पन्न झाले, तसेच त्याच्याकडे असलेली मोटारसायकल (क्र. एमएच 46 एएन 9398) ही त्याने पनवेल शहरातील सावरकर चौकातील एका इमारतीच्या पार्किंगमधून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply