Breaking News

झाडे लावा, वसुंधरा वाचवा!

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.
आपण आपल्या बाल्कनी, सोसायटी गार्डन किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेवर रोप लावून या मोहिमेत सहभागी होऊ शकता. वृक्षारोपण करताना काढलेला आपला फोटो pr.koshishfoundation@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा 7757000000 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर
पाठवावा. आपण घेतलेल्या गौरवास्पद पुढाकाराचा एक भाग म्हणून आम्ही आपले स्वागत सहभाग प्रमाणपत्राने करू. पृथ्वीने आजवर आपली खूप सेवा केली आहे. आता आपणही पृथ्वीसाठी सेवा करू या, असे परेश ठाकूर यांनी म्हटले आहे. या वेळी अर्चना ठाकूर उपस्थित होत्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply