नवी मुंबई : प्रतिनिधी
घणसोली नोड मध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर कचरा पडून आहे, तो लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी केली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून घणसोली नोड मध्ये घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे येथील रहिवासी कचरा रस्त्यावर टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. घणसोली नोंडमधील संबंधित अधिकार्यांना भाजप नवी मुंबई महामंत्री कृष्णा पाटील यांनी अनेक तक्रारी करूनदेखील त्यांनी काहीही उपाय योजना केली नाही. यावरून अधिकार्यांचा मनमानी कारभार चालू आहे, असा आरोप नागरिक करत आहेत.
स्वच्छ भारत अभियानात प्रशासन गतिमान होते, मात्र त्यानंतर घनकचरा विभागाने स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचर्याचे ढीग रस्त्यावर जमा झाल्याचे दिसते. प्रशासनाचा मनमानी कारभार थांबला नाही तर दहा तारखेनंतर रस्त्यावर पडलेला कचरा, विभाग अधिकार्यांच्या दालनात नेऊन टाकून जन आंदोलन उभे करूअसा इशारा महामंत्री कृष्णा पाटील यांनी मनपास दिला आहे. याबाबत उपायुक्त (घनकचरा विभाग) बाबासाहेब राजळे यांना विचारले असता घंटागाडी संदर्भात त्वरित सूचना देतो, असे सांगितले.