Breaking News

सीकेटी कॉलेज येथे आविष्कार संशोधन अधिवेशन कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) व मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने 17व्या आंतरमहाविद्यालयीन आविष्कार संशोधन अधिवेशनाच्या कार्यशाळेचे बुधवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले हाते. या वेळी मुंबई विद्यापीठ विशेष कार्यासीन अधिकारी मीनाक्षी गुरव, प्रगत प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आंतरविद्याशाखीय विज्ञान संचालक डॉ. शशीकुमार मेनन आणि  रिसर्च पीआय, डीएसटी- एसईआरबीच्या डीन डॉ. सुनीता शैलजन यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत रायगड झोन आविष्कार संशोधन संमेलनाचे जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश भगत  आणि डॉ. जगदीश ठाकूर यांचाही सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. संजय के. पाटील, यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाच्या तथा आविष्कार संशोधन अधिवेशनातील कीर्तीचा मागोवा घेतला. याबरोबरच डॉ. सुनील पाटील यांनी ही कार्यशाळा मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले. सर्व वक्त्यांनी आविष्कार संशोधन अधिवेशनाबाबत माहितीपूर्ण सत्रांद्वारे विविध पैलू उलगडले आणि संशोधन प्रकल्पासाठी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन अतिशय बारकाईने बनवण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्रात रायगड विभागातील 32 विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि 72 विद्यार्थी उपस्थित होते. आविष्कार रिसर्च असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सीमा कोकीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या सर्व सदस्यांसह कार्यशाळेचे यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. अहवाल वाचनाबरोबरच आभार डॉ. शर्मिला घंगाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकुर व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply