भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांचा पुढाकार
कळंबोली ः प्रतिनीधी
पनवेल-मुंब्रा महामार्गावर नावडे गावाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे गावात रस्ता ओलांडताना अंडरपासमधून जावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून येणार्या गाड्या दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे जीवितहानी टाळावी म्हणून भाजपचे युवा नेते दिनेश खानावकर यांनी स्वखर्चातून कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर बसविले आहेत. त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे. या मार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असते. नावडे गावच्या बाजूलाच औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहनांची वाहतूक जास्त आहे. त्यामुळे सतत होणार्या वाहतूक कोंडीने हैराण असलेले वाहनचालक रस्ता मिळेल, तशी वाहने चालवत असतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. या समस्येवर उपाय म्हणून दिनेश खानावकर यांनी स्वखर्चातून दोन्ही बाजूस कॉन्व्हेक्स सेफ्टी मिरर बसविले आहेत.