Thursday , March 23 2023
Breaking News

ग्रामपंचायतीच्या लढतींचे चित्र स्पष्ट

मुरूडमधील तीन ठिकाणच्या सरपंचपदासाठी 6 तर सदस्यांसाठी 21 उमेदवारी अर्ज मागे

मुरूड : प्रतिनिधी

मुरुड तालुक्यातील उसरोली, आंबोली आणि मजगांव  या तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या असून, बुधवारी (13 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंच पदाकरिताचे सहा तर सदस्य पदाकरिताचे 21 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

आंबोलीच्या थेट सरपंच पदाकरिता एकूण चार अर्ज होते.त्यापैकी आदिशा आदेश भोईर व रूचिता जानू माळी यांनी उमेदवारी मागे घेतल्याने येथे आता दोन उमेदवारात सरळ लढत होणार आहे. आंबोली ग्रामपंचायत सदस्य पदाच्या नऊ जागा असून, त्यासाठी एकूण 20 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यापैकी 3  अर्ज मागे घेतल्याने तेथे आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.

उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तेेथे सहा उमेदवारी अर्ज दाखल होते. त्यापैकी राजश्री नांदगांवकर, सचिन शिंदे, कल्पना म्हशीलकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तेथील 13 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 41 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 10 उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तेथे आता 31 उमेदवार नशीब आजमावित आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या मजगांव सरपंच पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अमित बुल्लू यांनी माघार घेतल्याने येथे आता सरळ लढत होणार आहे. येथे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मजगाव ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 29 नामांकन पत्रे दाखल झाली होती, त्यापैकी 8 अर्ज मागे घेतल्याने तेथे आता 21 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply