अ‍ॅडलेड कसोटी रंगतदार अवस्थेत

भारताची भेदक गोलंदाजी; ‘कांगारूं’ना रोखले

अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था
रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 191 धावांवर रोखले. पहिल्या डावात भारतीय संघाने 53 धावांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने एक गड्याच्या मोबदल्यात नऊ धावा केल्या आहेत. नाइट वॉचमन म्हणून आलेला बुमराह (0) आणि सलामी फलंदाज मयांक अगरवाल (5) नाबाद आहेत. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ लागोपाठ दुसर्‍या डावातही अपयशी ठरला आहे.
दुसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाकडे 62 धावांची आघाडी आहे. आजच्या एका दिवसात एकूण 15 विकेट पडल्या. यामध्ये भारताच्या पाच (पहिल्या डावात चार) आणि ऑस्ट्रेलियाच्या दहा विकेटचा समावेश आहे. सामन्याचे अद्याप तीन दिवस बाकी आहेत. भारतीय संघ दुसर्‍या डावात किती धावांचा पल्ला पार करतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 11 धावांत भारताचे खेळाडू बाद झाले. विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 244 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स या सलामीवीरांना बुमराहने पायचीत करीत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. तीन जीवदान मिळालेला मार्नस लाबुशेनने एका बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. अखेर रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या भेदक मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ 191 धावांवर आटोपला. कर्णधार टीम पेनचे अर्धशतक आणि लाबुशेनची एकाकी झुंज या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वतःवरची नामुष्की टाळली. भारताकडून पहिल्या डावात अश्विनने चार, यादवने तीन आणि बुमराहने दोन बळी घेतले.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply