Breaking News

खारघरमध्ये महायुतीच्या प्रचाराला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर प्रभाग 5मध्ये प्रचारात महायुतीने जोरदार आघाडी घेतली असून, खारघऱमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारावर जोर दिला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची निवडणूक पुन्हा जिंकणार, अशी प्रतिज्ञा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे  पदाधिकारी या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत मनपातील भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मतदारसंघात राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारांपुढे जात असून, खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा लोकसभेवर पाठविण्याचा निर्धारही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.उन्हाचा कडाका असतानाही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी भेटण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.एकूणच खारघर निवडणूकमय होऊन गेले आहे.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply