रसायनी ः प्रतिनिधी
आपटा गावातील कुंभार समाजाचे जुन्या पिढीतील मूर्तीकार नारायण वाडेकर व त्यांच्या पत्नी सुमती वाडेकर हे त्यांची मूर्तीकला आजही जपत आहेत. वयाची पंच्याहत्तरीतसुद्धा मूर्ती बनवत आहेत. सध्या त्यांची गणेशमूर्ती बसनविण्यासाठी लगबग सुरू आहे. गावातील तरुण पिढीतील कलाकार प्रसाद टेंबे हे शाडूच्या मूर्ती करून लोकांच्या आवडीप्रमाणे करून देतात. टेंबे यांच्या मूर्ती बाहेरच्या देशातही पाठविल्या जातात. यंदाही मूर्तींची किंमत वाढलेली आहे. रंग, मजुरी व शाडूच्या मातीचा दर वाढलेला असल्याने ही भाववाढ झाली आहे. आपटा हे एक खेडे असूनही गावातील लोक त्यांची कला जपत आहेत. अपुरी साधने, मनुष्यबळ कमी तरीही दरवर्षी हे कलाकार आपली कला व संस्कृती जपत आहेत.