सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळेचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभागाच्या वतीने 22 ते 26 ऑगस्ट 2022 याकालावधीत पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी उरण नागरीसंरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे आणि शशिकांत शिरसाट हे प्रमुख मार्गदर्शक लाभले आहेत.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.)एस. के. पाटील यांनी केले. या वेळी नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभागाचे प्रमुख प्रो.(डॉ.) भंडारे उद्धव तुकाराम यांनी कार्यशाळेच्या पाच दिवसांची रूपरेषा सांगितली आणि सहसंयोजक, केअर टेकर ऑफिसर प्रा. निलीमा तिदार यांनी उद्घाटन सत्राचे आभार मानले.
या कार्यशाळेत कॅडेटसना नागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आधुनिक लष्करी तंत्रज्ञान, अग्निशमन उपाययोजना, प्रथमोपचार,आधुनिक शस्त्रप्रणाली, जैविक-रासायनिक शस्त्रास्त्रे व त्यासंबंधीच्या उपाययोजना, युद्धजन्य परिस्थितीचा सामना कसा करावा इ. विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील,आय.क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी मार्गदर्शन आणि शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यशाळेच्या आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी नॅशनल कॅडेटस् कौर विभागाचे प्रमुख प्रो.(डॉ.) भंडारे उद्धव तुकाराम आणि सहसंयोजक, केअर टेकर ऑफिसर प्रा. निलीमा तिदार तसेच कॅडेटस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेचे यशस्वी उद्घाटन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.
कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयात गुणवत्ता मूल्यमापन लेखन स्पर्धा
कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (दि. 23) पनवेल विभागाचे स्टॅर्न्डड क्लब ऑफ बीआयएसचे मॅनेजर पुष्पेन्द्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नववी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी ‘गुणवत्ता मूल्यमापन’ लेखनाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला.
‘होलमार्क’ (बीआयएस)बाबत जागृती निर्माण व्हावी व त्याची सुरुवात मुलांपासून व्हावी या हेतूने हा कार्यक्रम घेतला शिवाय गुणवत्ता मूल्यमापन कसे होते ते आवश्यक का आहे याची सर्व माहिती मुलांना दिली. गुणवत्ता ‘होलमार्क’ ची गरज नव्या पिढीला समजली पाहिजे असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्टॅर्न्डड क्लब ऑफ बिसचे डेप्युटी डायरेक्टर आशिष वाकले तसेच सीकेटी ज्युनिअर कॉलेजचे दिनेश पवार हेदेखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना या वेळी रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक वृंद पर्यवेक्षिका व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, पर्यवेक्षक कुसुम प्रजापती व शिक्षिका सरिता सोमानी यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक भालशंकर हनुमंत, काटकर वेदांत यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक चौबल अवनीव, पोकर अवनी तर तृतीय क्रमांकाचे मानकरी खोत अथर्व व नाळे श्रेयस तर उत्तेजनार्थ वाघ रिद्धी व भूमी चिबडे यांनी बक्षीस मिळवले. या व्यतिरिक्त तीन उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे लोकरे निधी, गमरे सिमरन, बांगर शुभम व म्हामुणकर यश यांनी पटकावली.
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अॅडव्हान्स एक्सेल कार्यशाळा
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 24) माहिती व तत्रंज्ञान विभागातर्फे ‘अॅडव्हान्स एक्सेल‘ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे प्रमुख उदिष्टय महााविदयालयातील प्राध्यापकांना एक्सेल व अॅडव्हान्स एक्सेल बददल सविस्तर माहिती देणे हे होते. कार्यशाळेसाठी बी. के. एक्सेल कळंबोलीचे कॉर्पोरट ट्रेनर बिरू कोळेकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून सर्व प्राध्यापकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी एक्सेल आणि अॅडव्हान्स एक्सेल बद्दल महत्त्वाची माहिती आत्मसाद केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद गायकवाड यांनी ‘एक्सेल’चे सध्याच्या युगात असणारे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.
कार्यशाळेसाठी महाविदयालयाच्या अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षाच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन माहिती व तंत्रज्ञान प्रभारी विभाग प्रमुख प्रा. मीनल मांडवे यांनी केले. तसेच प्रा. महेश धायगुडे यांनी बिरू कोळेकर यांचा परिचय करून दिला. तसेच प्रा. महेश धायगुडे, प्रा. पेरणा सातव, प्रा. राजश्री म्हात्रेे, प्रा. स्नेहा लोखंडे, नितीन वासकर, अनंत सावंत व सहकारी यांनी सहकार्य केले.
कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय कला प्रकल्प स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश
खारघर : रामप्रहर वृत्त
कला चिल्ड्रेन अकादमीतर्फे राज्यस्तरीय आर्ट प्रोजेक्ट स्पर्धा झाल्या. या स्पर्धा सर्व शाळांतून घेण्यात आल्या. या स्पर्धेत खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सेजल रामशीष सरोज हिने सहभाग घेऊन, रजत कलाकृती पदक मिळविले.
सेजल रामशीष सरोज या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
रामशेठ ठाकूर महाविद्यालयात ‘परिसंवाद’
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि.23) स्पर्धा परिक्षा केंद्र व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सी.ए.फाऊंडेशन कोर्स या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तसेच वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नम्रता गजरा यांही प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी उपस्थितांना सी.ए.कोर्सेबद्दल सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रेवन शिंदे व प्रा. महेश धायगुडे यांनी केले. तसेच महादेव चव्हाण, प्रा. राजश्री म्हात्रे, प्रा. नम्रता पारिक यांनी सहकार्य केले. या वेळी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख व सचिव डॉ. एस. टी गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.