Breaking News

सीकेटी महाविद्यालयात नागरी सुरक्षा कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात नॅशनल कॅडेटस् कौर (एनसीसी) विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 26 ऑगस्टदरम्यान पाच दिवसीय नागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी नागरी संरक्षण दल उरणचे सहाय्यक उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे आणि शशिकांत शिरसाट हे प्रमुख मार्गदर्शक लाभले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी केले. या कार्यशाळेत कॅडेट्सना नागरी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन,आधुनिक लष्करी तंत्रज्ञान, अग्निशमन उपाययोजना, प्रथमोपचार,आधुनिक शस्त्रप्रणाली, जैविक-रासायनिक शस्त्रास्त्रे व त्यासंबंधीच्या उपाययोजना, युद्धजन्य परिस्थितीचा सामना कसा करावा इ. विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले व त्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. यामध्ये नॅशनल कॅडेटस् कौरच्या 111 कॅडेट्स आणि अकाउंट, फायनांस शाखेच्या 44 विद्यर्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या कार्यशाळेच्या समारोप समारंभासाठी नागरी संरक्षण दलच्या उपनियंत्रक राजेश्वरी कोरी प्रमुख अतिथी लाभल्या होत्या. त्यांनी नागरी संरक्षण दलाचे महत्त्व सांगून कॅडेट्सना संरक्षण दलात सहभागी होण्याची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन दिले, तसेच प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसी. समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर हे उपस्थित होते.

कार्यशाळेसाठी नॅशनल कॅडेटस् कौर विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. भंडारे उद्धव तुकाराम आणि सहसंयोजक,केअर टेकर ऑफिसर प्रा. निलीमा तिदारआणि कॅडेट्सनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply