Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात डीएलएलई प्रशिक्षण कार्यक्रम

खारघर ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवारी (दि. 26) लाईफ लाँग लर्निंग अ‍ॅण्ड एक्सटेशन मुंबई विद्यापीठ विभागातर्फे डीएलएलईचा प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमासाठी डीएलएलई मुंबई विद्यापीठचे अध्यक्ष डॉ.कुणाल जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तसेच सीकेटी महाविद्यालयाचे डीएलएलई विभागप्रमुख डॉ. बी. एस. पाटील, डॉ. शितल जाधव हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत डीएलएलई मुंबई विद्यापीठ क्षेत्र समन्वयक प्रा. किरण पाटील, प्रा. संतोष पाटील, प्रा. अलोक बच्चाव हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणासाठी रायगडमधून सुमारे 40 महाविद्यालयातील डीएलएलईचे समन्वयक आणि प्रत्येकी दोन विद्यार्थी व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाद्वारे उपस्थितांना डीएलएलई अंतर्गत करण्यात येणार्‍या सहा प्रकल्पांची सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी उपस्थितांना डीएलएलईचे महत्त्व समजावून सांगितले व पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन डीएलएलई विभागप्रमुख प्रा. महेश धायगुडे यांनी केले. प्रा. सफिना मुकादम, प्रा. अंकिता जांगिड, डॉ. अविनाश जुमारे प्रा. योगिता पाटील यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरूणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply