Breaking News

स्वच्छतागृहांची माहिती देणार अॅप

पनवेल महापालिकेच्या स्वच्छता हर कदम मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी

स्वच्छतागृहांची माहिती देणारे ’स्वच्छता हर कदम’ या मोबाइल अ‍ॅपचे उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) मुख्यालयात करण्यात आले. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्टार्टअपच्या माध्यमातून हे अ‍ॅप व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे. स्टार्टअप सप्ताह कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीने यासाठी निधी दिला आहे. हे अ‍ॅप अ‍ॅपल आणि अँड्राईड मोबाइलवर डाउनलोड करता येणार आहे.

व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्टार्टअप कंपन्यामधील शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेली कंपनी आहे. ही कंपनी सुरुवातीस हे अ‍ॅप महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छता निरीक्षकांसाठी याचे ट्रेनिंग नाट्यगृहात देण्यात आले. स्वच्छता हर कदम या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील एकूण 288 शौचालयामधील 2500 सीटसची स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीची रिअल टाइम माहिती मिळणार आहे. यामध्ये कर्मचार्‍यांनी स्वच्छतागृहाचे जीओ टॅगिंगचे फोटो पाठविल्यावर ट्रेनिंग घेतलेले स्वच्छता निरीक्षकांना त्या वॉर्डचे नाव, प्रत्यक्ष ठिकाणाचे नाव, वेळ, शौचालयामधील पायर्‍या, फरशा, डस्टबीन, नळ, बादल्यांची सद्य स्थिती डॅशबोर्डवरती दिसणार आहे.  भौगोलिक माहिती प्रणालीच्या मदतीने स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबद्दल माहिती संकलित केली जाणार आहे. तीच माहिती वेबसाइटद्वारे नकाशावर प्रदर्शित केली जाणार आहे.

या नकाशावर महापालिकेला शौचालयाच्या स्वच्छतेच्या स्थितीची माहिती मिळणार आहे. जसे की स्वच्छतागृह वापरण्यायोग्य आहेत की नाही, जवळचे वापरण्यायोग्य शौचालय उपलब्धी इत्यादी. या मोबाइल अ‍ॅपमध्ये जिओफेन्सिंग कार्यप्रणाली आहे जी शौचालयांच्या रिअल टाइम मॉनिटरिंगची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मदत करते. या माध्यमातून मिळणार्‍या माहितीच्या आधारे शौचालयाची माहिती मिळेल.

ऍप्लिकेशन डॅशबोर्डवरून महापालिकेला भौगोलिक माहिती प्रणाली वापरून डेटाचे विश्लेषण करून अहवाल तयार करता येणार आहे. या अहवालावरून शौचालयांच्या स्वच्छतेवरती लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा प्रदान करण्याचे प्रयत्न महापालिका करणार आहे. येत्या दीड-दोन महिन्यात हे अ‍ॅप नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

या वेळी उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, हितेन जोशी पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेजचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर प्रियम पिल्लई, जनसंपर्क अधिकारी निवेदिता श्रेयांश, प्राध्यापक शरद शिंगाडे, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे ,  पिल्लई इंजिनिअरींग कॉलेजचे व्हॅलेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुमन कुमार, तेजस जांभळे, सिमा शिंगाडे, नितीन मनकर, सागर गावडे, पियुष जगताप, निलेश माळवदे, कल्पना परदेशी, आसीम शेख, पियुष जयपूरकर विद्यार्थी तसेच स्वच्छता विभागाचे इंजिनिअर, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply