Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोखाडा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन; ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्सकडून भरीव देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील एएससी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 8) करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव, ठेकेदार संतोष चोथे, महाविद्यालय स्थानिक समिती सदस्य कुणाल लाडे, संस्थेचे निरीक्षक संजय मोहिते, जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. डॉ. यशवंत उलवेकर, उपप्राचार्य प्रा. संदनशीव, प्रा. जे. बी. वारघडे, प्रा. डॉ. संतोष जाधव, प्रा. डॉ. अमोल ममलय्या, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः कार्यरत असून, दुसर्‍यांनाही ते प्रेरित करीत असतात. त्यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांच्या इमारतींची उभारणी झाली असून, त्यांचे योगदान समाजाला प्रेरणादायी ठरले आहे. अतिदुर्गम मोखाडा भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने येथे महाविद्यालयीन विज्ञान विद्यार्थ्यांकरिता अडीच कोटी रुपये खर्चून दोन मजली इमारत उभारली जाणार आहे. इमारतीत आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय, सेमिनार व लेक्चर हॉलसह अन्य सुविधा असतील. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी इमारत उभारणीसाठी एक कोटी रुपयांची भरीव देणगी आपल्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. कंपनीच्या वतीने देण्याचे जाहीर केले होते. त्यातील 50 लाखांचा धनादेश त्यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्तावर संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी शिंदे यांच्यासह उपस्थित रयतसेवकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply