Breaking News

खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण; राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी तत्परतेने खचलेल्या रस्त्याचे काम स्वःखर्चाने पूर्ण करून दिल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. शहरातील कोळीवाडा येथील काही भागाचा रस्ता खचलेला होता. या संदर्भात तेथील रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेशी संपर्क साधून तक्रार सुद्धा केली होती. गणेशोत्सवाच्या काळात येथून ये-जा करताना नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले असते. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मा.नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधला व सदर रस्त्याचे काम पूर्ण करून देण्याची मागणी केली. राजू सोनी यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून व गणपती बाप्पांचे आगमन व विसर्जन सुखरुप व्हावे या दृष्टीने त्वरित स्वःखर्चाने त्या परिसरातील रस्ता तात्काळ सुस्थितीत बनवून दिला. याबद्दल तेथील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply