दुबई : वृत्तसंस्था
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये पुन्हा एकदा रविवारी (दि. 3) सुपर-4चा महामुकाबला होणार आहे. याआधी उभय संघात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता.
संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील लढती रोमहर्षक होत आहेत. पाकिस्तानने हाँगकाँग संघाला पराभूत करून सुपर-4मध्ये स्थान मिळविले आहे. यामुळे रविवारी भारत-पाक पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …