सुधागड : रामप्रहर वृत्त
सुधागड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळळल्याने खबरदारी म्हणून पाली बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा ग्रामपंचायत आणि व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. या बंदला मंगळवारी (दि. 26) पहिल्याच दिवशी शंभर टक्के प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका सुरक्षित होता, मात्र दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील नागशेत येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर
आले. त्यामुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला होता. त्यानुसार दुकाने व अन्य सर्व व्यवहार बंद होते. दरम्यान, या निर्णयाचे काही नागरिक स्वागत करीत आहेत, तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
कर्जतमधील किराणा दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंतच राहणार सुरू
कर्जत : कर्जत रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या इमारतीमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने कर्जत किराणा असोसिएशनने तातडीची बैठक घेऊन शहरातील किराणा मालाची दुकाने पुढील तीन दिवस दुपारी 2 वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मदन ओसवाल यांनी सोमवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास तातडीची बैठक बोलविली. या वेळी प्रमुख व्यापारी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून संपूर्ण दिवस सुरू असलेली किराणा मालाची दुकाने शहरात आलेल्या या संकटामुळे पुढील तीन दिवस सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेतच उघडी ठेवण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …