उरण : रामप्रहर वृत्त
उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 1725 कोटींचे 22 टन हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. एका कंटेनमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक केली होती. चौकशीत या दोघांना अनेक खुलासे केले होते. त्याच्या आधारे पोलिसांनी 1200 कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता मुंबईच्या बंदरावरही एक कंटेनर असल्याचे समोर आले.
याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचे विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन न्हावा शेवा बंदरावर दाखल झाले आणि कारवाई करीत तब्बल 22 टन हेरॉइन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्यानुसार या हेरॉइनची किंमत एकूण 1725 कोटी इतकी आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हा कंटेनर दिल्लीला नेण्यात आला आहे.
Check Also
भव्य कटआऊट्स; चित्रपटाचं मोठेपण त्यातही
आज सगळीकडेच लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ची जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपट शौकिनांपासून इतिहासाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीनुसार …