Breaking News

‘मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न मिळावा’

गोवा सरकारची शिफारस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. याबाबत अजून अधिकृत निर्णय घेतलेला नाही, पण अनौपचरिक चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी म्हटले की, पर्रिकर हे फक्त गोव्याचेच नव्हे तर भारताचे संरक्षणमंत्री म्हणूनही मोठे नेते होते. त्यामुळे या पुरस्कारासाठी तेच योग्य उमेदवार आहेत. याबाबतचा औपचारिक निर्णय पर्रिकर यांचे सर्वांत निकटचे सहकारी नूतन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घेतील.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाच्या प्रवक्त्या शायनी एनसी म्हणाल्या की, ज्या व्यक्तीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामान्य व्यक्तींच्या हितासाठी प्रयत्न केले, अशा व्यक्तीला ही योग्य श्रद्धांजली असेल. त्यांनी सामान्य व्यक्तीला आपल्या कामांमुळे नेहमी प्रेरित केले आहे. अद्याप हा निर्णय सहकारी पक्षांना औपचारिकपणे सांगण्यात आलेला नाही, परंतु सहकारी पक्ष याला समर्थन देतील असा विश्वास सरकारला आहे. भाजपाचा सहकारी पक्ष मगोपाने यापूर्वीच दक्षिण गोव्यातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या ज्यूरी ब्रिजला पर्रिकरांचे नाव देण्याची मागणी केली आहे. बांधकाममंत्री आणि मगोपाचे प्रमुख सुदीन ढवळीकर यांनी नवीन पुलाच्या दोन्ही स्तंभावर पर्रिकरांचे छायाचित्र असेल, अशी घोषणा केली आहे. पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी वयाच्या 63व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply