Breaking News

रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 213 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू आणि 213 नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी (दि. 25) झाली. दुसरीकडे 411 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण तीन, उरण व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि खालापूर व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 59, अलिबाग 44, माणगाव 30, कर्जत 17, सुधागड 12, उरण व रोहा प्रत्येकी 11, श्रीवर्धन नऊ, खालापूर आठ, पेण पाच, म्हसळा व महाड प्रत्येकी तीन आणि मुरूडमध्ये एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 24,655 व मृतांची संख्या 741 झाली आहे. जिल्ह्यात 20,962 जण कोरोनामुक्त झाल्याने 2952 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply