पेण : प्रतिनिधी
पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदार आणि खातेदारांना 12 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने शुक्रवारी (दि. 23) बँकेच्या मुख्य शाखेजवळ संघर्ष समितीतर्फे निषेध व्यक्त करून मृत ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
758 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेला आता 12 वर्षे पूर्ण झाली तरी या बँकेच्या जवळपास एक लाख 98 हजार ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने अखेर यावर्षी पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने अर्बन बँकेतील आतापर्यंत पाचशेहून अधिक मृत झालेल्या ठेवीदारांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आणि बँक बुडव्या प्रमुख घोटाळेबाजांचे श्राद्ध घालण्यासाठी रायगडसह मुंबईसारख्या ठिकाणी असणार्या लाखो ठेवीदारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पेणमध्ये एकत्र येणार आहेत.
23 सप्टेंबर 2010 रोजी या बँकेचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर आता या घटनेला 12 वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण होऊन देखील न्याय मिळत नाही. याचा निषेध व मृत ठेवीदारांना आदरांजली आणि प्रमुख घोटाळावाजांचे श्राद्ध घालण्यासाठी पेणमधील नागरिकांनी आणि बँकेच्या ठेवीदार, खातेदारांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता जमण्याचे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी केले आहे.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …