Saturday , December 3 2022

रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्स समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रिसर्च पेपर पब्लिकेशन यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेसाठी आयटीएम एसआयए बिझनेस स्कूलच्या डॉ. संगीता त्रोट या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित प्राध्यापकांना संशोधन पद्धती, संशोधनाचे प्रकार संशोधनाचे महत्त्व, रिसर्च पेपर का लिहावेत, कसे लिहावेत, यासाठी विषय कसे निवडावेत व त्यासाठी कोणते नियम पाळावेत, निवडलेल्या विषयासंदर्भात माहिती कशी गोळा करावी, माहितीचे वर्गीकरण कसे करावे, संदर्भ ग्रंथ हे सर्व संशोधनातील बारकावे प्रमुख वक्त्यांनी प्राध्यापकांनसोबत शेअर केले. तसेच उपस्थित प्राध्यापकांनी संशोधनाशी निगडित असणारे विविध प्रश्न उपस्थित केले व संशोधनातील बारकावे समजून घेतले. प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड यांनी सर्व उपस्थित प्राध्यापकांना अध्ययन व अध्यापनामध्ये असणारे संशोधनाचे महत्त्व व संशोधना मधील असणारी आव्हाने याबद्दल मार्गदर्शन केले व पुढील संशोधनासाठी सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. या कार्यशाळेचे आयोजन माहिती व तंत्रज्ञान विभाग व सेमिनार वर्कशॉप कॉन्फरन्स समितीतर्फे समितीचे प्रमुख प्रा. प्रेरणा सातव प्रा. मिलन मांडवे डॉ. नीलम लोहकरे प्रा. नम्रता परीक यांनी केले. तसेच तांत्रिक कामासाठी सावंत सर व दीपक म्हात्रे यांनी सहकार्य केले.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply