Saturday , December 3 2022

उरणच्या अमेया यार्डमध्ये आग

तीन कोटींचा कलमार जळाला

उरण : बातमीदार, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणार्‍या अमेया यार्डमधील कलमारला आग लागण्याची घटना गुरुवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास घडली आहे. या आगीत तीन कोटी रुपये किमतीचा कलमार जळून नष्ट झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जेएनपीए बंदरातून देश परदेशात आयात-निर्यात होणार्‍या मालाची साठवणूक ही बांधपाडा (खोपटा) ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अमेया यार्डमध्ये केली जाते. मालाने भरलेला कंटेनर हा ट्रेलरवर ठेवण्याचे काम हे यार्डमधील कलमार हे करत असतात. अशा या कलमारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची दुदैवी घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. आगीत कामगार वर्गाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही, मात्र आग विझविण्याचे साधन तातडीने उपलब्ध होऊ न शकल्याने आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कलमार भस्मसात पडला आहे. यासंदर्भात अमेया यार्ड चे वरिष्ठ अधिकारी राहिल निगम यांच्याकडे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply