सुधागड ः रामप्रहर वृत्त
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 2) सुधागड तालुक्यातील आदिवासींना 50 धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रईर्स कादरी यांच्यातर्फे हा विधायक उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन देखील करण्यात आले. या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांच्या चेहर्यावर हसू फुलले होते.
धान्य किटचे वाटप करतांना कादरी यांच्यासह अल्पसंख्याक सेलचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस गौसखान पठाण हे देखील होते.