रेवदंडा : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा आयोजित कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. 24) उत्साहात झाला. स्पर्धेत आंदोशी आखाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर वाडगाव द्वितीय व मांडवाने तृतीय क्रमांक पटकावला. रंगतदार कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्ती प्रेमी मंडळीने केली होती.
प्रतिवर्षी लक्ष्मीपुजनाचे निमित्ताने रेवदंडा हायस्कूलच्या पटागंणात पारंपरिक कुस्ती स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडाचे वतीने करण्यात येते. या कुस्ती स्पर्धेत जिल्हातील नामवंत खेळाडूंनी यापूर्वी सहभाग नोंदविला असल्याने या पारंपरिक कुस्ती स्पर्धेचा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे.
स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, तत्पूर्वी हनुमान प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून व श्रीफळ वाढवून पुजाअर्चा करण्यात आली.
या वेळी संदिप घरत यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच श्री छत्रपती शिवाजी मंडळ चौल-रेवदंडा अध्यक्ष सुरेश खोत, खजिनदार शरद वरसोलकर, चिटणीस हेमंत गणपत, सदस्य मधुकर फुंडे, महेश ठाकूर, सुभाष शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे सुत्रसंचलनाची जबाबदारी राजेंद्र नाईक यांचेवर सोपविण्यात आली. पंचाचे काम वासूदेव पाटील आंदोशी, रविंद्र घासे नवगाव, प्रमोद भगत आवास, सुधाकर पाटील आंदोशी, व वैभव मुकादम बेलोशी यांनी पाहिले.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …