उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे पॉझिटिव्ह 31 नवे रुग्ण आढळून आले असून, दोघांचा उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. तर 7 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आढळलेल्या रुग्णांत जसखार येथील चार, जेएनपीटी वसाहत चार, घारापुरी तीन, आवरे तीन, उरण दोन, ओएनजीसी सीआयएसएफ दोन, पाणजे दोन, कोटनाका दोन, कोप्रोली कोळीवाडा, उरण कामठा, धाकटीजुई, मोरा, ओंकार कॉलिनी, विमला तलाव, उरण, नागाव पिरवाडी, करंजा व प्रेम क्रिष्णा सोसायटी उरण येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर जेएनपीटी सेक्टर-2 येथील व श्रीयोग नगर सोसायटी करंजा येथील अशा दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत उरण तालुक्यातील कोरोना चाचणी करण्यात आलेल्या 1204 रुग्णांपैकी 580 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 390 रुग्ण आजपर्यंत पूर्ण बरे झाले आहेत. तर 17 रुग्णांना कोरोनाच्या महामारीत आपले प्राण गमवावे लागके आहे. याशिवाय 173 कोरोना बाधित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
महाडमध्ये 11 कोरोना रुग्णांची नोंद
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये एका तीन बर्षाच्या बालिकेसह 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एक जन बरा झाला असुन एका संशयित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत बिरवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, काळीज बिरवाडी येथे 58 वर्षीय आणि 25 वर्षीय पुरुष, कांबळे तर्फे बिरवाडी 54 वर्षीय पुरुष, रावढळ 36 वर्षीय पुरुष, प्रभात कॉलनी दाभाडकर हॉस्पीटल समोर 22 वर्षीय पुरुष, शेल 26 वर्षीय स्त्री, शेल 28 वर्षीय स्त्री, काकरतळे महाड 58 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अदित्य नर्सिंग होम महाड येथील तीन वर्षीय बालिका आणि तिची 31 वर्षीय आई यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर एक जन उपचार घेऊन पुर्ण बरा झाला आहे. तसेच नविपेठ महाड येथील एका 75 वर्षीय कोरोना संशयित वृध्द महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
कर्जत तालुक्यात चार जण बाधित
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशे पार झाली आहे. शुक्रवारी त्यामध्ये आणखी चारने भर पडली आहे. बँक ऑफ इंडियाच्या तीन शाखेतील कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली. आजपर्यंत तालुक्यात 315 कोरोना रुग्ण आढळले असून 186 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली तर 117 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांत कर्जत, मुर्द्रे, भडवळ, भिसेगांव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असून दोन स्त्रिया व दोन पुरुषांचा समावेश आहे.