Breaking News

रसायनीत, उरण येथे छठपुजा साजरी

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परीसराने वेढलेला भाग  असल्याने या परीसरात कामानिमित्त व व्यवसायासाठी आलेले हिंदी भाषिक नागरिकांची मोठी संख्या आहे. हे नागरिक गेल्या पंचवीस वर्ष छठपुजा उत्सव मोहोपाडा तलाव, रिस पुल व पाताळगंगा नदीकाठी मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. रसायनीतील मोहोपाडा तलाव, रिस पुलाजवळ हिंदी भाषिक नागरिक छटपुजेनिमित्त एकत्र येतात. या वेळी छठपुजेचा व्रत करणार्‍या महिलांनी सुर्यंदेवाची मनोभावे पूजा केली. रसायनी परीसरातील हिंदी भाषिकांनी चार दिवस अगोदरच उपवास करून तिसर्‍या दिवशी मावळत्या सुर्यांला अर्ध्य देण्यासाठी सायंकाळी रिस व मोहोपाडा येथे मोठी गर्दी दिसून आली. मावळत्या सुर्याला अर्ध्य देण्यासाठी महिला विविध वेशभूषेत पुजेचे साहित्य घेऊन रिस येथे जमले होते. या वेळी छटपूजेचा उपवास करणार्‍या महिलांनी डुबत्या सुर्यांला अर्ध्य देण्यासाठी पाण्यात उभ्या राहून सुर्यपुजन केले. या वेळी सुर्यदेवाची प्रार्थना करून माझ्या कुटुंबाच्या जीवनात सुखसमृद्धी, आरोग्यसंपन्न राहू दे अशी सुर्याला विनवणी करुन अर्ध्य दिला तर सोमवारी सकाळी उगवत्या सूर्याला अर्ध्य देवून उपवासाची सांगता करुन पुजा रिस व मोहोपाडा येथे झाली. या वेळी हिंदी भाषिक नेते संतोष गुप्ता, विनोद जयस्वाल, गीता पांडे, प्रकाश भारद्वाज, राजनाथ पटेल, संतोष पांडे आदी उपस्थित होते.

उरण येथे छट्पूजा उत्साहात

उरण : उरण मधील एनएडी पिन जेट्टी, नेव्हल स्टेशन करंजा, उरण पिरवाडी समुद्र किनारी, उरण नगर परिषदेच्या विमला तलाव यादी ठिकाणी रविवारी (दि. 30) सायंकाळीसूर्यास्ताच्या वेळेला  व सोमवारी (दि. 31) सकाळी सूर्योदयच्या वेळेस उत्तर भारतीय नागरिकांनी सूर्य देवताला मनोभावे पूजा करून छट्पूजा केली. सूर्य देवताला पूजेसाठी उस, केळी, अननस, सफरचंद, चिकू आदि विविध प्रकारची फळे नेवैद म्हणून सर्वांना प्रसाद म्हणून वाटली बसंत पंचमी उत्सव मंडळ यांच्या वतीने पीरवाड समुद्र किनारी सर्वांचे स्वागत करण्यात आले.झारखंड, बिहार, युपी या ठिकाणातून रहिवाशी उरण येथे कामा निमित्त आले आहेत त्यामुळे आम्ही दर वर्षी मनोभावाने सूर्य देवाची पूजा करतो, अशी प्रतिक्रिया मंजू राकेश कुमार यांनी व्यक्त केली.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply