उरण : वार्ताहर
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दिन व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांचे जीवन कार्य व त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व डॉ. पवार यांनी उलगडून सांगितले. राष्ट्रीय एकता दौडच्या आयोजनाप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेच्या 40 स्वयंसेवकांनी एकता दौडमध्ये सहभागी झाले. प्रा. सुप्रिया नवले, अस्मिता ठाकूर, प्रा. श्रीकांत गोतपगार, बाळकृष्ण दगडे, कार्यालयीन, प्रमुख अविनाश पाटील, प्रा. मुजावर मॅडम, प्रा. अर्जुन पाटील तसेच कार्यालयीन सेवकांनी राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रा. चिंतामण धिंदळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकार यांनी केले. कार्यक्रमाची पूर्व तयारी मयूर पाटील, अभिजित पाटील, तन्वी म्हात्रे, मंदिरा म्हात्रे, आरती सुरवसे, दीपेन तांडेल यांनी केली. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.