Breaking News

पनवेलमध्ये पाण्याची नवीन पाईपलाईन

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने  शहरातील धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्‍या या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 1) परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, नीता माळी तसेच नंदा ओझे, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, बूथ अध्यक्ष सुशांत पाटणकर, सोहन जोशी, तन्मय पटवर्धन, अदिती ओझे, महेंद्र गोडबोले, प्रशांत शेट्ये यांच्यासह सी. जे. मुनोत नगर ए विंग ते जी विंग, पुरुषोत्तम सदन, गोविंद अनंत, गुरू आशिष, आदित्य विहार, मंगल कलश, श्री स्वामी समर्थ, श्री सदन इत्यादी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
पनवेल शहराचा भौगोलिक विचार करता महात्मा फुले रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, राम गणेश गडकरी रस्ता हा परिसर अत्यंत प्राचीन परिसर मानला जातो. या परिसरात अनेक वाडे अस्तित्त्वात होते. कालांतराने शहरीकरणामुळे वाड्यांचे रूपांतर विविध सोसायटीमध्ये झाले. परिणामी लोकसंख्यादेखील वाढली. एवढ्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता तसेच भविष्यातील टोलेजंग इमारतींचा डेव्हलपमेंटचा विचार लक्षात घेता महात्मा फुले रस्त्यावर धूतपापेश्वर ते दगडी शाळा एवढ्या पट्ट्यात होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. या पट्ट्यात दोन पाण्याच्या लाईन्स आहेत एक आठ इंची व एक 6 इंची. कोविड काळात या भागातील सहा इंची पाईपलाईनमध्ये ड्रेनेज पाणी मिसळले गेले. त्यामुळे ती लाईन बंद करून पूर्ण भार आठ इंची लाईनवर टाकावा लागला.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरवठ्याने धूतपापेश्वर ते दगडी शाळा येथे सात लाख 85 हजार रुपये खर्च करून नवीन आठ इंची पाईपलाईन टाकण्यात येत आहे. यामुळे सी. जे. मुनोत नगर ए विंग ते जी विंग, आदित्य विहार सोसायटी, मंगल कलश सोसायटी, श्री स्वामी समर्थ सोसायटी, श्री सदन सोसायटी आणि नव्याने होऊ घातलेली गुरू आशिष सोसायटी या सर्व सोसायट्यांना उद्भवणारी पाण्याची समस्या संपुष्टात येऊन प्रत्येक सोसायटीच्या प्रत्येक विंगला मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. त्याबद्दल परिसरातील नागरिक आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांना धन्यवाद देत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply