Breaking News

डोलकाठीच्या तुर्‍यावर बांधण्यासाठीचा गरुडध्वज ढाक डोंगरावरून देऊळवाडीत दाखल

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला. कोरोनाचे संकट दूर झाल्याने या वेळी कार्तिक पौर्णिमेची यात्रा उत्साहात होणार आहे. गरुडध्वजाची पूजा प्रकाश पुंडलिक बडेकर व लक्ष्मण मावकर यांच्या हस्ते देऊळवाडी येथील मंदिरात करण्यात आली. त्यानंतर श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थानचे सचिव दिलीप बडेकर, अविनाश खंडागळे, नितीन बेडकर, अरविंद बडेकर, चिराग बडेकर, संकेत बडेकर, बिपिन बडेकर, अंकित गायकर, विवेक पाटील, राज बडेकर, सोहम बडेकर, गणेश बडेकर, शत्रुघ्न बडेकर, संदीप बडेकर, प्रशांत बडेकर, किरण बडेकर, अनिकेत बडेकर, संकेत बडेकर, ओंकार बडेकर आदी ग्रामस्थ ढाक डोंगरावर गेले होते. ढाक येथील भैरी मंदिरात गरुडध्वजाची पूजा पुरोहित गजानन उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप बडेकर, मनोहर कदम, पोलीस पाटील विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर हा गरुडध्वज देऊळवाडी येथे आणण्यात आला. हा ध्वज ढोलकाठीच्या तुर्‍यावर बांधण्यात येणार आहे. त्यांनतर सोमवारी (दि. 7) सकाळी साडेसात वाजता ही डोलकाठी मंदिराजवळ उभी करण्यात येईल. मंगळवारी (दि. 8) कार्तिक पौर्णिमेला या डोलकाठीच्या मोरपिसार्‍याने मंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही 30 फुट उंचीची डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेवून नाचविण्यात येते.

कोरोनाचे संकट टळल्याने यंदा यात्रा उत्साहात होईल. तसेच मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याने आम्हाला चांगल्या प्रकारे व्यवस्था करता येणार आहे.

-दिलीप बडेकर, सचिव, श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, देऊळवाडी 

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply