लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा; दिशा महिला मंचचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर
दिशा महिला मंच आयोजित बाल दिन विशेष भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन रांगोत्सव सेलिब्रेशनच्या सहकार्याने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेज येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 470 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता चार गटामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकी विजेत्या स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्राचार्य स्वप्नाली संजय म्हात्रे व संजय म्हात्रे, तसेच आरके ग्रुपचे राजेंद्र कोळकर, श्रीकृष्णा चाईल्ड व डेंटल क्लीनिकचे डॉ. संतोष कानगुले तसेच पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव शैलेश ठाकूर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी बाल दिनाच्या शुभेच्छा देत मुलांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे परीक्षण रेखा ठोंबरे, व प्रोफेसर नितीन ताराचंद निकम यांनी केले. भव्य दिव्य अशी स्पर्धा व्यासपीठाच्या संस्थापक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव खुशी सावर्डेकर व इतर हिरकण्याच्या सहकार्याने झाला. या वेळी निरव नंदोला, अल्पेश माने, प्रशांत कुंभार, अरुण जाधव यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. व्यासपीठाच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर व्यासपीठाच्या हिरकणी रुक्मिणी अर्जुन, नीलिमा सहाणे, दिक्षा ढोणे, वंदना वाघमोडे, पूनम शेलार, गीता कुडाळकर, अनिता मागाडे, मनिषा शिंदे, स्नेहल चेलेकर, सोनल, विभावरी, शिल्पा आदींच्या सहकार्याने बाल दिनाचा कार्यक्रम झाला. चार गटातील या स्पर्धेत दिविषा घोडेश्वर, ओवी दूधवडकर, स्वयंम शेट्टी, समृद्धी मनसुखे यांनी प्रथम क्रमांक पटकला तर आरोही तेल्हार, स्वरा पवार, दुर्वा जाधव, आर्यन कदम यांनी द्वितीय, तसेच रियांश नाईक, पलश म्हात्रे, अमृता खांडगे, लतीका बाग या विद्यार्थांनी तृतीय क्रमांक पटकवला तसेच रिवांश खांडगे, मृण्मयी नांदगावकर, संचीता दैने व क्षितिज जगताप या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
महापालिकेच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम
पनवेल : पनवेल महापालिकेच्या 11 शाळांमध्ये बाल दिनानिमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन करून विविध कार्यक्रम राबविण्यात आले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गीत गायन स्पर्धा, भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,समुहगीत स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. लोकनेते दि. बा. पाटील शाळेमध्ये इनरव्हील क्लब ऑफ पनवेलच्यावतीने बालदिनानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले. शिक्षण विभाग प्रमुख बाबासाहेब चिमणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्वच शाळांमधील मुलांनी यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. दरम्यान, पालिकेच्या मुख्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखापरिक्षक विनयकुमार पाटील, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.