Breaking News

चांगू काना ठाकूर विद्यालयात लोकनृत्य स्पर्धा

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयातील पूर्वप्राथमिक विभाग इंग्रजी पर्यवेक्षिका संध्या अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लोकनृत्य स्पधेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी विविध राज्यामधील लोकनृत्य अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. सुरुवात सरस्वती व पंडित नेहरू यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, ज्युनिअर कॉलेज कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागोच पर्यवेक्षक प्रशांत मोरे, इंग्रजी पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, इंग्रजी पूर्वप्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका संध्या अय्यर आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply