परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
रसायनी : रामप्रहर वृत्त
बहुचर्चित आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसर्या हंगामाचे बीकेसी संघाने विजेतेपद पटकाविले आहे. आदित्य फायटर संघ उपविजेता ठरला. विजेत्यांना पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते व रोटरी क्लबचे सदस्य परेश ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने आयोजित आरपीएलचा अंतिम सामना रविवारी (दि. 13) रसायनी येथील एनआयएसएम मैदानात रंगला. अतिशय उत्कंठावर्धक झालेल्या अंतिम सामन्यात बीकेसी संघाने आदित्य फायटर संघाला नमवित विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत मालिकावीर म्हणून पुष्कराज जोशी, उत्कृष्ट फलंदाज समाधान दांडेकर, उत्कृष्ट गोलंदाज सचिन थोपटे तसेच फिफ्टी प्लस खेळाडू देवदत्त देशपांडे यांना मालिकावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह गणेश कडू, डॉ. संतोष जाधव, डॉ. अमोद दिवेकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मिडटाऊन प्रेसिडेंट कल्पेश परमार, सिटी प्रेसिडेंट मिसेस तन्ना, पंकज पाटील, सिकंदर पाटील, विक्रम कय्या, प्रीतम कय्या, बीकेसी संघाचे मालक भाऊ कोकणे, आदित्य फायटर संघाचे मालक अरविंद सावळेकर यांच्यासह इतर मान्यवर, खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.