Breaking News

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन

मुरूड : प्रतिनिधी  

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील मुख्य बाजारपेठ, आझाद चौक, भंडारवाडा, एकदरा या  भागात संचलन करण्यात आले. त्यात उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ व सुदाम मनवे, पोलीस नाईक सागर रोहेकर, परेश म्हात्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सहभागी झाले होते. मास्क लावा, सामाजिक अंतर राखा असे यावेळी संदेश संचलनातून देण्यात आले.

Check Also

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत सीकेटीच्या स्वस्तिका घोषची सुवर्णझेप

पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स …

Leave a Reply