Breaking News

विजय आर्मी स्कूलचे क्रीडा स्पर्धेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी या खेळात चिखले येथील विजय आर्मी स्कूलच्या मुलांच्या 19 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 17 वर्षाखालील संघाने उपविजेतेपद पटकाविले.
याशिवाय पळस्पे येथील एमएनआर स्कूलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या खेळात मुलांच्या 19 वर्षाखालील गटामध्ये विजय आर्मी स्कूलमधील मनीष गावित (इयत्ता बारावी) हा विद्यार्थी टॉप फाईव्हमध्ये अव्वल ठरला. त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलांच्या 17 वर्षाखालील गटात अमित गावित (इयत्तरा नववी) याचीही टॉप फाईव्हमध्ये निवड होऊन तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक देविदास पाटील यांचे मार्गदर्शन व क्रीडा शिक्षक आर. एस. पाटील व एस. ए. शेख यांचे सहकार्य लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे माजी केंद्रीय दळणवळणमंत्री विजय नवल पाटील व शाळेचे प्राचार्य एम. के. मराठे, कमांडर पीव्हीआर कृष्णन, उपप्राचार्य सोपान पाटील, पर्यवेक्षक व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply