पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल येथील कच्छ युवक संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणार्या रक्तदान चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा रविवारी (दि. 14) पार पडला. संजय जैन मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे 102वे रक्तदान शिबिर लोकसहभागातून यशस्वी झाले. या शिबिरात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून रक्तदान केले.
मिडलक्लास हौसिंग सोसायटीतील श्री गणपती मंदिरात झालेल्या शिबिराला भाजप नेते संजय जैन, पंकज रूपारे, किरीट सावळा, धीरज मारू, प्रवीण गाला, नितीन शहा यांच्यासह इतरांची उपस्थिती लावली. त्याचप्रमाणे कच्छ युवक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, रक्तदान हे महादान आहे.लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केल्याने उपस्थित रक्तदात्यांमध्ये विशेष उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली. समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
शिबिरादरम्यान रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, सुरक्षित रक्तसंकलन आणि आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper