Saturday , December 3 2022

बेलापूर येथे आगरी-कोळी कोकण महोत्सव उत्साहात

नवी मुंबई  : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना प्रभाग 39 पुरस्कृत शिवतेज मित्र मंडळ तर्फे बेलापूर येथील सी. एन. जी. पेट्रोल पंप शेजारील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विजय नाहट, शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सवाचे 4 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत उप शहर प्रमुख विशाल कोळी, महिला उप शहर संघटक तेजस्वी विशाल कोळी, उपशहर प्रमुख राम कोळी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 20 नोव्हेंबर रोजी या महोत्सवाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने व पारितोषिक वितरण कार्यक्रमा ने झाली.  महोत्सवात संस्थापक शिवतेज मित्र मंडळ बेलापूर विशाल कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवदरम्यान शिवसेना नेते विजय चौगुले, उपनेते  विजय नाहटा, रोहिदास पाटील, सरोज पाटील, निळकंठ म्हात्र आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सदर महोत्सव यशश्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळ संस्थापक विशाल कोळी, अध्यक्ष भूषण मोरे, सेक्रेटरी रामा कोळी, उप सेक्रेटरी पांडुरंग बिरादार, खजिनदार प्रकाश आमटे, सचिव नागेश पाटील, उप खजिनदार धवल जैन, सह सचिव मंगेश रामा कोळी, वेदांत विशाल कोळी, गणेश म्हात्रे आदींसह उप शहर संघटक तेजस्वी विशाल कोळी, सुनंदा रामा कोळी, विभाग संघटक सविता पाटील, शाखा संघटक वैशाली प्रकाश आमटे, बबन बाबर, इंगळे मॅडम, राजेश्री भोरे, अर्चना बिरादार, मनीषा बाबर, अविना म्हात्रे, वेदांती कोळी, प्राची कोळी, नियती पाटील, अ‍ॅड. मानसी कोळी आदींसह युवा कार्यकर्त्यांनी  मेहनत घेतली.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply