Breaking News

सीकेटी विद्यालयात संविधान दिनानिमित्त जागर फेरी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयात संविधान दिनानिमित्त बुधवारी (दि. 23) जागर फेरी काढण्यात आली. यामध्ये कब-बुलबुल व तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जागर फेरी नवीन पनवेल परिसरात फिरवण्यात आली. भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांना मिळालेली देणगी आहे. भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे. त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना कळावे हे या जागर फेरीचे उद्दिष्ट आहे. मुख्याध्यापक श्री. मानकर यांच्या हस्ते जागर फेरीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply