Sunday , October 1 2023
Breaking News

सकारात्मक चर्चेनंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई ः बातमीदार
बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजप शिष्टमंडळासह नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीबाबत सकारात्मक झालेल्या चर्चेनुसार जनआंदोलन सद्यस्थितीत स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे बेलापूर ग्रामस्थांकरिता बेलापूर गावातील जुने कुस्तीचे मैदान हे खेळाचे मैदान म्हणून आरक्षित करून महापालिकेस हस्तांतरित करण्याकरिता सिडकोकडे मागणी करणे, गोवर आजारावरील प्रतिबंधक लस व ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्लू वॅक्सिंन मोफत उपलब्ध करणे, सीवूड्स येथील नागरी समस्या त्वरित सोडविणे, सानपाडा येथील नागरी समस्या त्वरित सोडविणे, बेलापूर गाव व रेल्वे लाईन येथे भुयारी मार्ग निर्माण करणे अशा विविध विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ.राजेश पाटील, नगरसेवक दीपक पवार, सुनील पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, जनार्दन सुतार, पांडुरंग आमले, दि.ना.पाटील, सुहासिनी नायडू, जयवंत तांडेल, राजू तिकोने, रवी म्हात्रे, ज्योती पाटील, मंगेश म्हात्रे, सिनू डॅनियल, संदेश पाटील, कल्पेश कुंभार, रणजीत नाईक, सुधीर पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, महापालिकेविरोधात जे जनआंदोलन उभारण्यात आले होते ते सद्यस्थितीत रद्द करण्यात आले आहे. राज्य शासन व महानगरपालिका नियमानुसार अपेक्षित निर्णय घेतील, अशी आम्हाला आशा आहे.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply