Breaking News

सीकेटी महाविद्यालयात एचआयव्ही एड्सविषयी जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात राष्ट्रीय कॅडेट कोर विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र आणि दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. 1) आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय कॅडेट कोर विभागाचे प्रमुख एएनओ कॅप्टन डॉ. यु. टी. भंडारे, सीटीओ एन. पी. तिदार, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख एन. सी. वडनरे उपस्थित होते. एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थ्यांनी एचआयव्ही एड्स जनजागृती करणारी भित्तीपत्रके तयार केली, तसेच जनजागृती रॅलीही काढली. या कार्यक्रमात सूक्ष्मजीवशास्त्र शाखेच्या 44 विद्यार्थ्यांनी आणि 65 एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. शैलेश वाजेकर यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्याशाखांचे प्रमुख, विविध विभागाचे प्रमुख आणि सर्व प्राध्यापक वर्गाने या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर आणि सचिव एस. टी. गडदे यांनी कौतुक केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply