लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली पाहणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. हा सप्ताहा अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. या कृतज्ञता सप्ताहाचा सांगता समारंभ वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात 16 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘रयत’चे मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विष्णूदास भावे नाट्यमंदिरात सुरू असलेल्या कामाची मंगळवारी (दि. 13) पाहणी केली.
कृतज्ञता सप्ताहाचा सांगता भारत सरकारच्या अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पार्श्वभुमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विष्णूदास भावे नाट्यमंदिरात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक, प्राध्यापक सी. डी. भोसले आदी उपस्थित होते.