Breaking News

पदपथावर अवैध धंदे, पार्किंगची समस्या

पनवेलमध्ये वाहतूक शाखेची कारवाई सातत्याने व्हावी; नागरिकांची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिका हद्दीत पदपथावरील अवैधधंदे दुचाकी आणि  चारचाकी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. एखादा अपघात झाल्यावरच त्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.

नवीन पनवेलमध्ये पूल ओलांडून आल्यानंतर एचडीएफसी सर्कलला रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर कॉर्नरला आयडीबीआय, आयसीआयसीआय बँक आणि पहिल्या मजल्यावर स्टेट बँक ऑफ इंडियासमोर एचडीएफसी बँक आहे. या बँकांची एटीएम तेथेच तळमजल्यावर आहेत. येथील संपूर्ण फुटपाथवर दुचाकी वाहने उभी केलेली असतात. याठिकाणी सिग्नलवरून येणार्‍या गाड्या भरधाव वेगाने येत असल्याने रस्त्यावरून चालणे म्हणजे अपघातला आमंत्रणच आहे. फुटपाथवर दुचाकी उभ्या असल्याने चालायला रस्ताच नसतो. अनेक वेळा स्टेट बँकेच्या एटीएमच्या दरवाजात ही दुचाकी उभ्या करून  ठेवलेल्या असतात त्यामुळे एटीएम मध्ये जाणे ग्राहकाला अवघड जाते. या अडचणीचा फायदा गुन्हेगार घेऊ शकता. पैसे काढून बाहेर पडणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचा धोका संभवतो.

नवीन पनवेलमध्ये एचडीएफसी सर्कलला मोटरसायकल व स्कूटरवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आता सायकल, मोटरसायकल व स्कूटर उभ्या करून ठेवण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक पोलिसांनी कारवाई करू नये म्हणून काही चारचाकीचे मालक गाडीच्या चाकाला वाहतूक पोलीस लावतात तसे जॅमर लावून गाडी उभी करून ठेवतात.

रेल्वे स्टेशन जवळील विचुंबेकडे जाणार्‍या रस्त्यावर आणि फुटपाथवर ही दुचाकी वाहने उभी केलेली असतात. त्याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. सायंकाळी रस्त्यावरून भरधाव जाणार्‍या रिक्षा व दुचाकी यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालता येत नाही.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply