Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पुरस्काराने सन्मानित

चौक : रामप्रहर वृत्त

अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मंगळवारी

(दि. 30) चौक येथील एनडी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांना सकाळ एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय, चाहते, तसेच मान्यवर पाहुणे आणि सेलिब्रिटी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे पुरस्कार सोहळा रंगतदार झाला. अनेक सत्कारमूर्ती सहकुटुंब उपस्थित होते.

या हृद्य सोहळ्यास कला दिग्दर्शक नितीन देसाई, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विधानसभा विस्तारक अविनाश कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल आदी उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply