Breaking News

पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र पाटील यांना वाढता पाठिंबा

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र प्रचाराचे पडघम वाजू लागले असून, पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र सदानंद पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदासाठी श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तरुणांचे आशास्थान आणि स्थानिक पातळीवर मोठ्या उमेदीने कार्यरत असलेले जितेंद्र पाटील यांना पागोटे ग्रामपंचायत निवडणुकीत येथील मतदारांचा वाढता पाठींबा मिळत आहे. नऊ सदस्य संख्या आणि 10वा सरपंच अशी आकडेवारी असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री राम समर्थ आघाडीच्या वतीने सदस्य पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून रोशन दत्तात्रेय पाटील, जितेंद्र मन्नाथ म्हात्रे व संपदा सुनील तांडेल हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये मनिष केशव तांडेल, वैजयंती संजय पाटील व नंदिनी संतोष ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रतिभा सतिश पाटील, अजित वसंत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. 1150 मतदार संख्या असलेल्या या पागोटे ग्रामपंचायत हद्दीत जेएनपीए बंदराच्या अनुषंगाने साकार ण्यात आलेली कंटेनर हाताळणारी विविध गोदामे

कार्यरत आहेत. यामुळे पागोटे ग्रामपंचायतीच्या विकासाला चालना देण्यासाठी या गोदामांतून मालमत्ता कराच्या रूपाने येणारा निधीही सुयोग्य प्रकारे मिळत आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व शक्तीनिशी दोन्हीही बाजूच्या उमेदवारांनी घरोघरी लहान थोर मतदारांच्या भेटीगाठी घेणे अधिक पसंत केले असल्याचे चित्र पागोटे गावात दिसत आहे.

या निवडणुकीत थेट सरपंच पदाचे श्री राम समर्थ आघाडीचे  उमेदवार जितेंद्र पाटील व शिवसमर्थ परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार कुणाल पाटील यांच्याशी सरळ लढत होणार आहे. मात्र जितेंद्र पाटील यांना  पागोटे गावातील मतदारांचा वाढता पाठिंबा असल्याचे पाहूनच जितेंद्र पाटील यांच्याच नावाचा डमी उमेदवार विरोधकांनी  निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे. तरीही येथील मतदार सुज्ञ असून या निवडणकीत तरुणांची मोठी फळी निर्माण करणारे या निवडणुकीत शिटी निशाणी घेऊन निवडणूक लढविणारे जितेंद्र सदानंद पाटील यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply