Breaking News

आरोग्य महाशिबिरासंदर्भात डॉक्टरांची बैठक

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवण्यात येणारे आरोग्य महाशिबिर येत्या 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि डॉक्टरांची बैठक सोमवारी (दि. 29) पनवेल येथील सुरूची हॉटेलमध्ये झाली. या वेळी महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हे महाशिबिराचे होत असते. त्या अनुषंगाने यंदाचे 16वे महाशिबिर आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने डॉक्टरांची बैठक पनवेलच्या सुरूची हॉटेलमध्ये झाली.
या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ. गिरीश गुणे, डॉ. रमेश पटेल, भाजप शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी आणि डॉक्टर उपस्थित होते. या वेळी महाशिबिराच्या नियोजनासंदर्भात विचारविनामय करण्यात आला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

मंत्री आदिती तटकरे यांनीही केली पाहणी उलवे नोड : रामप्रहर वृत्तमातृभाषेत शिक्षण घेतल्यावरही आपली चांगली …

Leave a Reply